महाराष्ट्र केसरी 2023

  1. Maharashtra Kesari Kusti 2023 : महाराष्ट्र केसरीत कोण मारणार बाजी?; पैलवान म्हणतात..., maharashtra kesari kusti spardha 2023 start in pune
  2. Maharashtra Kesari 2023 : अवघ्या दोन मिनिटात चितपट; शिवराज राक्षे 'महाराष्ट्र केसरी'चा मानकरी
  3. महाराष्ट्र हे संयमी आणि शांतताप्रिय राज्य
  4. Maharashtra Kesari 2023 : शेतकरीपुत्र, दुखापतीतून सावरून पटकावली मानाची गदा, कोण आहे शिवराज राक्षे?
  5. Maharashtra Kesari 2023 Pune Today Is The Final Fight Of Maharashtra Kesari
  6. Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरीचा मानकरी; महेंद्र गायकवाड उपविजेता
  7. Women Maharashtra Kesari 2023: सांगलीत आजपासून रंगणार पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा!
  8. Maharashtra kesri 2023 winner & kusti video


Download: महाराष्ट्र केसरी 2023
Size: 28.27 MB

Maharashtra Kesari Kusti 2023 : महाराष्ट्र केसरीत कोण मारणार बाजी?; पैलवान म्हणतात..., maharashtra kesari kusti spardha 2023 start in pune

महाराष्ट्र केसरीत कोण मारणार बाजी? पुणे : पुण्यात सुरु असलेल्या कुस्ती स्पर्धेसाठी मल्ल मैदानात उतरले आहे. यात मानाची महाराष्ट्र केसरी गदा कोण जिंकणार याकडे सर्व कुस्ती प्रेमिचे लक्ष लागले आहे. कुस्तीचा महाकुंभ म्हणून महाराष्ट्र केसरी स्पर्धेकडे पाहिले जाते. त्यासाठी अनेक पैलवान चार पाच वर्ष सराव करतात. महाराष्ट्र केसरीची माळ गळ्यात पडण्यासाठी मल्लांना सरावाची गरज असते. गेल्या दोन वर्षात कोरोनाचे संकट देशात असल्यामुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही. त्यामुळे महाराष्ट्र केसरीसाठी मल्लांनी दोन वर्षाची प्रतिक्षा संपली असून मल्ल मैदानात दंड थोपटून उभे आहेत. 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात सुरू : मल्ल सकाळी रोज उठणे, रनिंग ,पेटी व्यायाम खाणे, असे सगळे त्यांच्या दिवसभराचा कार्यक्रम असतो. यावर्षी आपल्या गावाचे ,आपल्या तालमीचे ,आपले स्वतःचे नाव मोठे करण्यासाठी मोठ्या जिद्दीने हे पैलवान सराव करत आहे. त्यांच्या या सरावाला दोन वर्षे जो थोडासा ब्रेक लागला होता.तो आता संपला आहे. कारण महाराष्ट्र केसरी स्पर्धा 65 वी पुण्यात सुरू आहे. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे. महाराष्ट्र केसरीची अपेक्षा : या स्पर्धेसाठी विविध गटात रंगतदार लढत बघायला मिळत आहे. माती तसेच मॅट प्रकारात कुस्तीचा खेळ आखाड्यात रंगला आहे. विविध भागातून येणाऱ्या प्रत्येक मल्लांना बक्षिसाची आशा आहे. मात्र, महाराष्ट्र केसरीची गदा जिंकण्यासाठी मल्लांना प्राणाची बाजी लावावी लागणार आहे. यंदा भत्ता डायरेक्ट अकाउंटला जमा : महाराष्ट्रातून अनेक तालमीचे प्रशिक्षक, पैलवान सहभागी झालेले आहेत. पुण्यातील कोथरूड येथे स्वर्गीय अशोक मामा मोहोळ क्रीडा संकुलात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यात आज सकाळपासूनच कुस्तीप्रेमी कुस्ती शोकिं...

Maharashtra Kesari 2023 : अवघ्या दोन मिनिटात चितपट; शिवराज राक्षे 'महाराष्ट्र केसरी'चा मानकरी

Maharashtra Kesari 2023 : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धेचा थरार रंगला होता. आज महाराष्ट्र केसरी स्पर्धेची उपांत्य आणि अंतिम लढत पार पडली. या अंतिम लढतीत शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला चितपट करत मानाच्या महाराष्ट्र केसरी 2023 किताबावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे, अंतिम सामन्यात काही मिनिटातच निकाल लागला. पुण्यातील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत 65वी महाराष्ट्र केसही स्पर्धा पार पडली. उपांत्य लढतीत माती विभागातून महेंद्र गायकवाडने अंतिम सामन्यात धडक मारली, तर गादी विभागातून शिवराज राक्षे अंतिम सामन्यात आला. यानंतर या दोन्ही मल्लांमध्ये गादीवर अंतिम सामना पार पडला. दोन्ही पैलवान तुलनेने सारखेच असल्यामुळे सामना खूप वेळ चालेल अशी सर्वांना अपेक्षा होती. पण, अनुभवी शिवराज राक्षेने महेंद्रला चितपट करत अवघ्या काही मिनिटात महाराष्ट्र केसरीचा किताब आपल्या नावे केला. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Web Title: Maharashtra Kesari 2023 : Chitpat in two minutes; Shivraj Rakshe won 'Maharashtra Kesari' Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

महाराष्ट्र हे संयमी आणि शांतताप्रिय राज्य

बारामती, (वार्ताहर) : राज्यात कोल्हापूरसह अन्य काही ठिकाणी जे घडले ते महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणारे नाही. महाराष्ट्र हे संयमी, शांतताप्रिय राज्य आहे. येथील सर्वसामान्य लोकांची कायदा हातात घेण्याची प्रवृत्ती नाही. कोणी तरी काही तरी प्रश्नातून जाणिवपूर्वक वादविवाद वाढवायचा प्रयत्न करत असेल त्यांनाही माझे आवाहन आहे की याची किंमत सामान्य माणसाला भोगावी लागते. सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी असे प्रकार न घडतील याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बारामती दौर्‍यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, राज्यात घडलेल्या प्रकारानंतर शासकीय यंत्रणा किंवा पोलिस यंत्रणा जी काही पावले टाकत आहेत, त्या यंत्रणेला सर्वसामान्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे. आपण सगळ्यांनी यंत्रणेला सहकार्य केले, तर हे प्रकार तातडीने बंद होतील. कोल्हापूर शहर असो की अन्य शहरे असो. या सगळ्या शहरांना सामाजिक परिवर्तनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तेथे शांतता निर्माण केली पाहिजे. छत्रपती शाहू महाराज, महाराणी ताराराणी यांचा आदर्श ठेवून सामान्य माणसाच्या हिताची जपणूक केली पाहिजे. चार-दोन लोक कोणी चुकीचे वागत असतील; पण बहुसंख्य समाजाने संयमाची भूमिका घेतल्यानंतर राज्य शासनाने त्यामध्ये सामंजस्याची भूमिका घेतल्यानंतर ही स्थिती बदलेल आणि शांतता प्रस्थापित होईल. विरोधकांच्या बैठकीला जाणार बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा मला फोन आला होता. ते त्यांच्या राज्यामध्ये देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुखांची बैठक बोलवत आहेत. मला त्यांनी निमंत्रित केले आहे. तेथे मी जाणार आहे. यानिमित्ताने देशापुढील प्रश्नावर एकत्र येवून भू...

Maharashtra Kesari 2023 : शेतकरीपुत्र, दुखापतीतून सावरून पटकावली मानाची गदा, कोण आहे शिवराज राक्षे?

Maharashtra Kesari 2023 : पुण्यात रंगलेल्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra kesari 2023) कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अवघ्या दोन मिनिटात शिवराज राक्षेने (shivraj rakshe) सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला आस्मान दाखवून यंदाची मानाची गदा पटकावली. शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड हेअंतिम सामन्यातील दोन्ही मल्ल पुण्यातच सराव करत होते आणि विशेष म्हणजेवस्ताद काका पवार आणि गोविंद पवारयांचे शिष्य आहेत. शिवराज राक्षे हा नांदेड जिल्ह्याकडून खेळत असला तरी तो मूळचा पुणेजिल्ह्यातील राजगुरुनगरमघील राक्षेवाडीचा आहे. राक्षे व उपविजेता गायकवाड आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज येथे वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडे सराव करतात. उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यामधील आहे. एकाच तालमीतील दोन मल्लांमध्ये महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळवण्यासाठी लढत झाली. यात शिवराजने बाजी मारली.

Maharashtra Kesari 2023 Pune Today Is The Final Fight Of Maharashtra Kesari

Maharashtra Kesari 2023 : पुण्यात यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा घेणारच, नांदेडच्या शिवराज राक्षेचा निश्चय आज संध्याकाळी आधी अनुक्रमे मॅट आणि त्यानंतर माती विभागातील दोन अंतीम लढती खेळवण्यात येणार आहेत. यातील विजेत्यामधून महाराष्ट्र केसरीची अंतीम लढत खेळवण्यात येईल. नांदेडचा शिवराज राक्षे हा यावेळच्या महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. दुखापतीतून सावरत शिवराजने मॅट विभागाची अंतीम लढत गाठली आहे. इथे त्याची लढत 2019 चा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याच्याशी होणार आहे. यावेळी महाराष्ट्र केसरीची गदा घ्यायचीच या इराद्याने आपण आखाड्यात उतरत असल्याच शिवराजने म्हटलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी महाराष्ट्र केसरीसाठी मेहनत घेत आहे. त्यामुळं आता यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा घ्यायची असा मी निश्चय केला असल्याची माहिती नांदेडचा पैलवान शिवराज राक्षे याने दिली. कोणी कोणाला केलं पराभूत पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु आहे. यातील अंतिम लढती आज होणार आहेत. दरम्यान, काल झालेल्या लढतीत मॅट विभागातील पहिल्या उपांत्य लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने पुण्याच्या तुषार दुबे याचा पराभव केला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत वाशीमच्या सिकंदर शेख याने बुलढाण्याच्या बालारफिक शेखचा पराभव करून माती विभागातून महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम लढतीत प्रवेश केला आहे. गादी गटातील दुसऱ्या उपांत्य लढतीत नांदेडच्या शिवराज राक्षेने पुण्याच्या गणेश जगताप याचा पराभव करुन अंतिम लढतीत धडक मारली आहे. गादी विभागाची अंतिम लढत नाशिकचा हर्षवर्धन सदगीर आणि नांदेडचा शिवराज राक्षे यांच्यात होणार आहे. या दोघांमधील विजेता महाराष्ट्र केसरीच्या अंत...

Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरीचा मानकरी; महेंद्र गायकवाड उपविजेता

मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… नांदेडचा शिवराज राक्षे आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या लढतीमध्ये शिवराजने एका मिनिटात महेंद्राला चितपट करत ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानाच्या गदेवर नाव कोरले. शिवराजने माजी विजेत्या हर्षवर्धनला ८-१ असे पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. तर महेंद्रने वाशिमच्या सिकंदर शेखचा ६/४ असा पराभव केला होता. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अंतिम फेरीत पोहचलेले दोन्ही मल्ल हे पुण्याच्या एकाच तालमीत तयार झालेले आहेत. वस्ताद काका पवार व गोविंद पवार यांच्या कात्रजमधील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तालमीतील हे कुस्तीपटू आहेत. पाहा व्हिडीओ – पुण्यात शनिवारी (१४ जानेवारी) ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला. महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली. यामध्ये शिवराज राक्षे हा महेंद्र गायकवाडला चितपट करून विजयी झाला. (व्हिडीओ- सागर कासार) महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षे यास चांदीची गदा, रोख पाच लाख रुपये आणि महिंद्रा थार ही गाडी बक्षीस रुपात मिळाली आहे. तर, उपविजेत्या महेंद्र गायकवाडला ट्रॅक्टर आणि अडीच लाख रुपये बक्षीस मिळाले आहे.

Women Maharashtra Kesari 2023: सांगलीत आजपासून रंगणार पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा!

Maharashtra Kesari: पुण्यात रंगलेल्या 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुण्याचा पैलवान शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला आस्मान दाखवत मानाची गदा जिंकली. याच पार्श्वभूमीवर महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी सांगलीत आजपासून पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन दिवस चालणार आहे. या स्पर्धेचा पहिला बहुमान मिळवण्यासाठी राज्यातील महिला कुस्तीपटू मैदानात घाम गाळत आहेत. सांगलीत आजपासून पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात होत आहे. महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दहा वजनी गटासह खुल्या गटांतील कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६८, ७२ आणि ७६ वजनी गटातील मल्ल सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र केसरीसाठी ६५ वजनी गटावरील महिला मल्ल किताबासाठी लढणार आहेत. या स्पर्धेत ४५ जिल्ह्याचे संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा फक्त मॅटवर होणार आहे. महाराष्ट्र केसरी पैलवानासाठीच्या चांदीच्या गदेला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. महाराष्ट्र केसरीला स्पर्धेला १९६१ साली सुरुवात झाली, तेव्हापासून चांदीची गदा दिली जाते. १९८२ सालापर्यंत ही गदा महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेच्या वतीने देण्यात येत होती. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव माजी खासदार अशोक मोहोळ यांनी त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्यास गदा देण्याची परंपरा सुरू केली.

Maharashtra kesri 2023 winner & kusti video

Maharashtra kesri 2023 winner & kusti video: शिवराज राक्षेने शनिवारी कोथरूड येथे महेंद्र गायकवाडचा पराभव करत महाराष्ट्र केसरी 2023 चे विजेतेपद पटकावले. कोथरूड परिसरातील वनाजजवळील मामासाहेब मोहोळ क्रीडा केंद्रात खचाखच भरलेल्या घरासमोर राक्षेने महेंद्र गायकवाडचा पराभव केला. शिवराज राक्षे याने शनिवारी महाराष्ट्र केसरी विजेतेपद पटकावण्याच्या काही मिनिटांपूर्वी, राज्य सरकारने विजेतेपद मिळविणाऱ्या कुस्तीपटूंचे मानधन तिप्पट केले. महाराष्ट्र केसरी फायनल थरार: कोथरूड परिसरातील वनाझजवळील मामासाहेब मोहोळ क्रीडा केंद्रात खचाखच भरलेल्या घरासमोर राक्षेने महेंद्र गायकवाडचा पराभव करत प्रतिष्ठेचे ६५ वे महाराष्ट्र केसरी विजेतेपद पटकावले. मूळची पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगरची असलेल्या राक्षेने नांदेड संघाचे प्रतिनिधित्व केले. गायकवाड यांनी सोलापूर संघाचे प्रतिनिधित्व केले. रक्षेला चांदीची गदा, ५ लाख रुपये आणि महिंद्रा थार एसयूव्ही देऊन गौरविण्यात आले. उपविजेत्या गायकवाडला चांदीची गदा आणि अडीच लाख रुपये मिळाले. याआधी सामन्याच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानधनात तिपटीने वाढ करण्याची घोषणा केली, ज्यामुळे उपस्थितांना आनंद झाला. विजेत्यांवर होणार बक्षिसांचा वर्षाव ‘महाराष्ट्र केसरी’च्या विजेत्याला रोख ५ लाखांचे बक्षीस, थार गाडी आणि उपविजेत्याला ट्रॅक्टर व रोख अडीच लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तसेच, विविध १८ वजनी गटातील प्रत्येक विजेत्यावरही बक्षिसाचा वर्षाव होणार आहे. या १८ गटातील विजेत्यांना जावा कंपनीच्या गाड्या देण्यात येणार आहेत. त्यासोबतच कुस्तीपटूंना क्वालिटी किटही देण्यात येणार असल्याचे ‘महाराष्ट्र केसरी’चे प्रमुख संयोजक मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे. ...