ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग

  1. पुणे : पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त उद्या वाहतूक बदल


Download: ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग
Size: 21.54 MB

पुणे : पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त उद्या वाहतूक बदल

पुणे: पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त बुधवारी (१४ जून) शहराच्या पूर्व भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथून बुधवारी पहाटे मार्गस्थ होणार आहे. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा नाना पेठेतील श्री निवंडुग्या विठोबा मंदिर येथून मार्गस्थ होणार आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठ, रामोशी गेट, भवानी माता मंदिर, लष्कर भागातील मुक्ती फौज चौक, पूलगेट पोलीस चौकी, मम्मादेवी चौक, सोलापूर रस्ता, हडपसर गाडीतळ येथून सासवड रस्त्याने पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. श्री तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील अरुणा चौक, समाधान चौक, पिंपरी चौक, एडी कॅम्प चौक, रामोशी गेट, भवानी माता मंदिर, मुक्ती फौज चौक, पूलगेट पोलीस चौकी, मम्मादेवी चौक, सोलापूर रस्ता, हडपसर गाडीतळ येथून सरळ सोलापूर रस्त्याने लोणी काळभोरमार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. आणखी वाचा- बुधवारी पहाटे दोन वाजल्यापासून पालखी पुणे-सोलापूर रस्त्याने येणाऱ्या जड वाहनचालाकंनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत जाणाऱ्या दिंड्यामधील वाहनांनी भैरोबानाला चौक, लुल्लानगर चौक, कोंढवा खडीमशीन चौक, बोपदेव घाटमार्गे सासवडकडे जावे किंवा मंतरवाडी फाटा, फुरसुंगी, उंड्री, पिसोळी, खडी मशीन चौकमार्गे बोपदेव घाटातून सासवडकडे जावे. वाहतूक बदलांविषयी माहिती हवी असल्यास वाहतूक शाखा मुख्य नियंत्रण कक्ष (दूरध्वनी क्रमांक- ०२०-२६६८५००० किंवा ०२०-२६६८४०००) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.